नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यात म्हाडाच्या घरांसाठी आज सोडत काढण्यात आली. म्हाडाच्या ४ हजार ७५६ घरांसाठी ही सोडत काढण्यात आली. यासाठी सुमारे दहापट म्हणजे तब्बल ४१ हजार ५०१ नागरिकांनी अर्ज केले होते.
माजी सैनिक असलेले महेश गवळी आणि त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर हास्य फुलण्याचं कारण ठरलं ते त्यांना पुण्यात मिळालेलं म्हाडाचं घर. गवळी यांच्या प्रमाणेच सुमारे पाऊणे पाच हजार जणांचं पुण्यातल्या घराचं स्वप्न सत्यात उतरलं. पुण्यात घरांच्या किंमती प्रचंड वाढलेल्या आहेत. त्यामुळे परवडणाऱ्या दरातल्या म्हाडाच्या घरांसाठी मोठी मागणी आहे.
पुण्यात यापुढंही म्हाडाची घरं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. एकट्या पंतप्रधान आवास योजनेत वीस हजार घरं पुढल्या दोन वर्षांत तयार होणार असल्याचं, म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितलं. याशिवाय म्हाडाची स्वतःची आणि बाधंकाम व्यवसायिकांडून उपलब्ध होणारी २० टक्के घरंही विक्रीसाठी खुली होणार आहेत.
म्हाडाच्या घरांची संख्या वाढत असल्यानं, खासगी बाधंकाम व्यवसायिकांच्या घरांच्या किंमती कमी होतील असा विश्वास, म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.