Doctor Shrihari Halnor On Pune Porsche Accident: पुण्यातील ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनाही पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही पैशांच्या मोबदल्यात रक्ताचे नमुने बदलून अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या जागी अन्य व्यक्तीचं रक्त चाचणीसाठी पाठवल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मात्र आता या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या हळनोरने पोलिसांकडे जबाब नोंदवताना या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड हा अजय तावरेंच असल्याचा दावा केला आहे. रक्ताचे नमुने का बदलले यासंदर्भातील माहिती देताना हळनोरने यासाठी तावरेवरच आरोप केला आहे.
हळनोरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्ताचे नमुने बदलण्यासाठी तावरेने दबाव आणला होता. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी या दोघांबरोबरच शिपाई अतुल घटकांबळेही अटकेत आहे. रक्ताचे नमुने का बदलले यासंदर्भात कबुली जबाब देताना हळनोरने, "रक्ताच्या नमुन्यांमध्ये बदल केल्याचा प्रकार आपल्या मनाला पटला नाही. माझ्या हातून हा उद्योग करुन घेण्यात आल्यामुळे मला दोन दिवस झोप लागली नाही," असं हळनोरने पोलीस चौकशीमध्ये सांगितलं आहे. रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तिघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या तिघांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
नक्की वाचा >> Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहिती
कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक आणि कोझी व ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे. मात्र अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी 15 दिवसांची मुदत मागितली. पोलिसांच्या या मागणीला बचाव पक्षाने विरोध केला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने पोलिसांना 1 जून पर्यंत आपले म्हणणे मांडावे असं सांगितलं आहे.
या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई शिवानी आग्रवालचीही चौकशी होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाची आई सुद्धा सहभागी आहे का? गुन्हा लपवण्यात तिचाही सहभाग होता का? याचा पोलीस तपास करत आहे. तपासासाठी पोलिसांनी शिवानी अग्रवालला फोन केला होता. मात्र तिचा मोबाईल बंद असून ती नॉट रिचेबल आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
IND
(62.1 ov) 192 (112.3 ov) 387
|
VS |
ENG
00(0 ov) 387(119.2 ov)
|
Full Scorecard → |
WI
225(70.3 ov)
|
VS |
AUS
97/5(40 ov)
|
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
GER
(18.4 ov) 140
|
VS |
TAN
146/5(16.5 ov)
|
Tanzania beat Germany by 5 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.