कचरे ने ले ली सबकी जान...कचरा वेचकाचा सूचक अंदाज

कचरा वेचकाचा सुरेल अंदाज 

Updated: Nov 16, 2019, 03:40 PM IST
कचरे ने ले ली सबकी जान...कचरा वेचकाचा सूचक अंदाज  title=

मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या गोष्टीकडे कायम मनोरंजन याच दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पण सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कचरा वेचणाऱ्यांचा सुरेल पण सुचक अंदाज समोर आला आहे.

पुणे येथील पर्वतीच्या इथे हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेचे कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्याचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत त्यांनी पुण्यातील कचरा परिस्थितीवर भाष्य केलं आहे. 

पुणेकर ओला आणि सुका कचरा एकत्र करत असल्याची तक्रार या कचरा वेचणाऱ्यांनी केली आहे. तसेच प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनही सर्रास वापर केला जातो यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. पण हे गाण्याच्या अंदाजात केलं आहे. 'कजरा मोहोब्बत वाला..' या गाण्याच्या चालीवर कचरा वेचकांनी गाणं गायलं आहे. 

हा व्हिडिओ फेसबुकवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 44 हजाराहुन अधिक लोकांनी पाहिला आहे. 1100 हून अधिक लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून सामाजिक भान राखणारा संदेश गाण्याच्या रूपात दिला आहे. पुणे तिथे काय उणे... असं म्हणत असले तरीही या व्हिडिओत कचऱ्याबाबत किती उदासिन आहे हे मांडल आहे.