पुणे : शिक्षणाचं माहेरघर आणि सांस्कृतीक नगरी असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जेवढी धक्कादायक आहे तेवढीच ती एकप्रकारची मानसिक विकृती दर्शवणारी आहे. IT इंजिनीयर तरुणींना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
तरुणी तोकडे पकडे घालून फिरत असल्याच्या रागातून आयटी इंजिनीयर तरुणींना ही बेदम मारहाण करण्यात आली. या तीन तरुणी पेईंग गेस्ट राहात होत्या. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं त्यांना चपलेनं मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना चंदननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी पेईंग गेस्ट राहतात. खराडी इथल्या खासगी कंपनीत त्या नोकरी करतात. या तरुणी तोकडे कपडे घालून घराबाहेर फिरत असतात.
या तरुणी तोकडे कपडे घालत असल्याच्या रागातून शेजारी राहणाऱ्या एकाच कुटुंबातील लोकांनी मारहाण केली आहे. मारहाण करताना त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोपही आहे. महिला दिन अगदी तोंडावर आहे. मुलींनी काय घालवं आणि काय घालू नये याबाबत प्रत्येक महिलेला स्वतंत्र्य आहे असं पीडित महिलेनं तक्रार दाखल करताना म्हटलं आहे.