आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल  सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. (Aambet bridge)

Updated: Feb 3, 2021, 08:42 PM IST
आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद  title=

अलिबाग : रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा आंबेत पूल १० फेब्रुवारीपासून सर्वप्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. (Aambet bridge completely closed for traffic from February 10) सावित्री नदी (Savitri river) दुर्घटनेनंतर आंबेत पुलाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पुलाच्या दुरूस्तीचं काम केलं जात आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी फेरीबोट सेवा सुरू करण्यात आलीय. हा पूल बंद केल्यामुळे दापोली, मंडणगड, वेळास, बाणकोट, आंजर्ले, मुरूड, दाभोळ  इथे जाणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना डोकेदुखी होणार आहे. हा पूल नादुरूस्त झाल्यामुळे यावरची अवजड वाहनांची वाहतूक याआधीच बंद करण्यात आली होती. 

दुरूस्तीचं काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे हा पूल बंद ठेवण्यात येणार आहे. फेरीबोटीतून प्रवाशांना अवजड आणि छोटी वाहनं नेता येणार आहेत.