Rain alert | राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसाठी पुन्हा ओरेंज अलर्ट

 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे

Updated: Sep 5, 2021, 03:20 PM IST
Rain alert | राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसाठी पुन्हा ओरेंज अलर्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे. नुकताच हवामान खात्याने पुन्हा राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा दिला आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस झाला आहे. कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक झाला आहे. वेळोवेळी हवामान खात्याने दिलेले अंदाज खरे ठरले आहेत. त्यानुसार प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली आहे.

आज हवामान खात्याने (IMD) पुन्हा राज्यात 5 ते 9 सप्टेंबर दरम्यान गडगडाटासह मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचे इशारा दिला आहे. विशेषतः मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाचा प्रभाव सर्वदूर असेल.

दिनांक 7 आणि 8 सप्टेंबरला कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची तिव्रता जास्त असेल. सोबत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांना ओरेंज इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.