राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा

Raj Thackeray : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी  शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.

Updated: Dec 1, 2022, 03:32 PM IST
राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा  title=
संग्रहित छाया

Raj Thackeray In Konkan : राज्यात सुरु असलेल्या वादाबद्दल महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाष्य केले आहे. (Maharashtra News in Marathi) महापुरुषांच्या अपमानावरुन राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीय राजकारण वाढलंय, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. पवार भाषणात कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले. ( Maharashtra Politics News)

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आजपासून सिंधुदुर्गातून दौऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काल राज ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते कोकणात दाखल झालेत. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार आहेत. यावेळी बाळा नांदगावकर,अमित ठाकरेंसह मनसे नेते उपस्थित आहेत. सिंधुदुर्गातील संघटनात्मक बांधणीसाठी ही मनसेची महत्त्वाची बैठक होत आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे कोकण दौऱ्यावर असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटी घेतली.

बऱ्याच दिवसापासून कोकणात यायचं होतं. संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा आहे. पक्षांतर्गत विस्कळीतपणा दूर करण्यासाठी आलो आहे. पक्षातील गटबाजीला चाळण लावणं गरजेचं आहे. या गटबाजीला कंटाळून अनेक पदाधिकारी घरात बसले आहेत, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

 

'असा कायदा राज्यासाठी करता येत नाही'

 समान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. समान नागरी कायदा एका राज्यासाठी करता येत नसल्याचा दावा राज ठाकरे यांनी केले आहे. सामान नागरी कायदा एका राज्यात नाही. तर संपूर्ण देशात आणला जातो, असे ते म्हणाले.

'जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं'

इतिहासाकडे जातीमधून काही लोक पाहत आहेत. तो त्यांचा राजकीय स्वार्थ आहे. वेड्यात वीर दौडले सात याबाबत जयसिंग पवारांसोबत बोललो. जगात कोणत्याही इतिहासाच्या पानात कुठेही सात होते कि आठ होते याचा कुठेही दाखल नाही. जयसिंग पवार सुद्धा हेच म्हणाले. शिवरायांना धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीपातीचे राजकारण वाढलं आहे. जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडले असतील तर मला पोटात गोळा येण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी यावेळी दिले.