बहीण-भावाचा गोड क्षण होणार अधिक गोड; पावसाळ्यात राखी पाठवण्यासाठी 'वॉटरप्रुफ' Envelope

भावा-बहिणाचा हा सण अजून गोड करण्यासाठी पोस्टाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. 

Updated: Aug 2, 2022, 02:37 PM IST
बहीण-भावाचा गोड क्षण होणार अधिक गोड; पावसाळ्यात राखी पाठवण्यासाठी 'वॉटरप्रुफ' Envelope title=

Rakshabandhan News - बहीण-भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. 11 ऑागस्टला रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या लाडक्या भावासाठी राखी घेण्यासाठी लगबग सुरु केली आहे. मार्केटमध्ये राखी खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली आहे. अनेक महिलांचे भाव हे दुसऱ्या शहरात राहतात. प्रत्येक वर्षी रक्षाबंधनासाठी भावा किंवा बहिणीला भेटता येत नाही. मग अशावेळी आपण पोस्टाची मदत घेतो. पावसाळ्यात आपली राखी भावाकडे सुरक्षित पोहोचावे, असं प्रत्येक बहिणीला वाटतं. कारण पावसाळ्यात कागदी लिफाफामुळे ती खराब होतात. भावा-बहिणाचा हा सण अजून गोड करण्यासाठी पोस्टाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत. 

आता पावसाळ्यातही तुमची राखी सुरक्षित तुमच्या भावापर्यंत पोहोचणार आहे. पोस्ट विभागाने त्यासाठी वॉटरप्रुफ लिफाफा तयार केले आहेत. या वॉटरप्रुफ लिफाफामुळे राखीचे रेशीमबंध अधिक घट्ट होणार आहे. हा लिफाफा अवघ्या 10 रुपयांमध्ये मिळणार आहेत. तसंच पोस्ट विभागात या राखी असलेल्या पाकिटची वर्गीकरण करण्यासाठी वेगळे कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी पोस्टात एक खास वेगळी खिडकी सुरु करण्यात आली आहे. जेणे करुन महिलांचा वेळ रांगेत जाऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.