महिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा

 बीड जिल्ह्यात महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 4, 2018, 12:18 AM IST
महिला पोलिसावर बलात्कार प्रकरणी पीआयवर गुन्हा title=

बीड : बीड जिल्ह्यात महिला पोलिसावरच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तीन जणांवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा आष्टी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षकावरील आरोप

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी आष्टी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असताना वॉकीटॉकीची बॅटरी संपल्याचे कारण सांगितलं, आणि घरी बोलावले आणि इतर दोघांच्या मदतीने अत्याचार केला, असा आरोप महिला पोलिसाने केला.

हर्षवर्धन गवळी यांच्याकडून अत्याचार

परळी ठाण्यामध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी अत्याचार केल्याचा आरोप महिला पोलिसाने केला. 

४ महिन्यांपूर्वी अत्याचार केल्याचा आरोप

कामाच्या निमित्ताने ४ महिन्यांपूर्वी कार्यालयीन घरी बोलावून बलात्कार केला असल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलांवर अत्याचार होत असेल तर सर्वसामान्य लोक पोलिसांकडे दाद मागतात. मात्र आता पोलीस खात्यातील महिलाच सुरक्षित आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.