Ratan Tata and Shantanu Naidu: भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे टाटांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका नावाची चर्चा होत आहे ती म्हणजे टाटांचा बेस्ट फ्रेंड शांतून नायडूची. टाटांच्या निधनानंतर शांतनूने एक भावून पोस्टदेखील केली होती. पण तुम्हाला माहितीये का शांतून नायडू हा अस्खलित मराठी बोलतो.
शांतनू नायडू हा टाटांच्या जवळच्या व्यक्तीपैकी एक होता. रतन टाटांपेक्षा 55 वर्षांनी लहान असलेला शांतनू त्यांचा मित्र व सहकारी म्हणून त्याने काम केले आहे. दोघांची ओळख 2014 साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. शांतून हा टाटा कंपनीत काम तर करतोच. त्याचे स्वतःचे दोन स्टार्टअपदेखील आहेत. तसंच, तो लेखकदेखील आहे. त्याने I Came Upon A Lighthouse हे पुस्तक लिहले आहे. त्याने यात टाटांच्या मैत्रीबद्दल लिहलं आहे.
तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही पण शांतनू हा पुणेकर आहे. शांतनूचा जन्म 1993 मध्ये पुण्यातील तेलुगू कुटुंबात झाला आहे. तर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कुल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं आहे.
शांतनू हा गुडफेलो नावाच्या स्टार्टअपचा संस्थापक आहे. गुडफेलो हा एक स्टार्टअप असून या माध्यमातून वृद्धांना युवकांसोबत जोडण्यात येते. या अॅपचा मुख्य उद्देश हा आहे की, वृद्ध नागरिकांना त्यांच्या रोजच्या कामात मदत व्हावी. जसं की, किराणा सामान खरेदी करणे, औषधांची व्यवस्था करणे, डॉक्टरांकडे नेणे याप्रकारेच वृद्धांची मदत करणे.
गुडफेलोचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. या व्हिडिओवरुन अनेकदा शांतनू त्यांच्या स्टार्टअपविषयी माहिती देत असतो. तो बऱ्याचदा मराठीतूनही बोलताना दिसत आहे. अलीकडेच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांच्या अत्यंसंस्कारादरम्यानचा हा व्हिडिओ असून शांतून पोलिसांसोबत मराठीत संवाद साधताना दिसत आहे.
अखेर मला आता थोडासा शांत वेळ मिळाला आहे. मी आता त्यांना हसताना पाहू शकत नाही किंवा मी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकत नाही, ही गोष्ट मी स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं शांतनूने म्हटलं आहे.
जब #RatanTataSir के बेहद करीबी शांतनु नायडू को मुंबई पुलिस के सामने अपना परिचय देना पड़ा..#ShantanuNaidu #RatanTataPassedAway pic.twitter.com/FoEWL1tHU8
— Vivek Gupta (@imvivekgupta) October 10, 2024