Sanjay Manjarekar On Gautam Gambhir : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी (Border Gavaskar Trophy) टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकणं महत्वाचं आहे. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत सोमवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची (Gautam Gambhir) पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत गौतमचा गंभीर अंदाज पाहायला मिळाला. अनेक प्रश्नांवर गंभीरने रोखठोक उत्तर दिली. मात्र गंभीरचा हा अंदाज माजी क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjarekar) यांना आवडला नसून त्यांनी पोस्टद्वारे टीका केली आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची रोखठोक उत्तर दिली. यावेळी त्याने भारतीय संघावर टीका करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला खडसावले, तसेच रोहित आणि विराटच्या फॉर्मवरून त्यांची पाठराखण सुद्धा केली. गंभीरचा स्वभाव माहित असलेल्यांना त्याच पत्रकार परिषदेतील बेधडक वागणं काही नवं नव्हतं मात्र यावरून माजी क्रिकेटर संजय मांजरेकर यांनी गौतम गंभीरवर टीका केली. एवढंच नाही तर त्यांनी गंभीरला पुन्हा पत्रकार परिषदेत पाठवू नका अशी विनंती सुद्धा बीसीसीआयला केली.
हेही वाचा : मुंबई इंडियन्स IPL Auction मध्ये 'या' 5 माजी खेळाडूंवर लावणार बोली
मांजरेकर यांनी बीसीसीआयला टॅग करून पोस्टमध्ये लिहिले की, 'आताच मी गंभीरची पत्रकार परिषद पहिली. बीसीसीआयसाठी त्यांना या ड्यूटी पासून दूर ठेवणंच शहाणपणाचं ठरेल. कृपया त्याला पडद्यामागे काम करू द्या. त्याच न आचरण चांगलं आहे ना त्याला माध्यमांशी बोलण्याची पद्धत आहे. रोहित शर्मा आणि अजित आगरकर हे माध्यमांचा सामना करण्यासाठी योग्य आहेत'. संजय मांजरेकरांच्या या वक्तव्यानंतर काही नेटकरी त्यांना ट्रोल करत आहेत.
Just watched Gambhir in the press conference.
May be wise for BCCI to keep him away from such duties, let him work behind the scenes. He does not have the right demeanour nor the words when interacting with them. Rohit & Agarkar, much better guys to front up for the media.— Sanjay Manjrekar (sanjaymanjrekar) November 11, 2024
ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर गावसकर चषकातील 5 कसोटी सामने खेळण्यासाठी भारतीय संघ रवाना होण्यापूर्वी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गंभीरने पॉटींगवर निशाणा साधला आहे. "पॉटींगला भारतीय क्रिकेटबद्दल काय देणंघेणं आहे? मला वाटतं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटबद्दल विचार करावा. मुळात विराट आणि रोहितबद्दल त्याला चिंता वाटण्याचं काही कारण नाही. मला वाटतं की ते फार उच्च दर्जाचे खेळू आहेत. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी बरंच काही केलं आहे. भविष्यातही ते दोघे भारतीय क्रिकेटमध्ये भरीव योगदान देतील," असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.