रेस्क्यू टीमला मोठं यश... अखेर 19 दिवसांनी तो सापडला!

दागिन्यांच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचा खून करून त्याचा पोत्यात भरून नीरा नदीत (Nira River) फेकलेला मृतदेह अखेर जवळपास 19 दिवसांनी शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आलं आहे. 

Updated: Nov 4, 2022, 05:24 PM IST
रेस्क्यू टीमला मोठं यश... अखेर 19 दिवसांनी तो सापडला!  title=

निलेश खरमरे, झी मीडिया, भोर: सध्या समाजात अनेक गुन्हे घडत आहेत त्यामुळे गावागावात शहराशहरात दहशत निर्माण झाली होते. यामुळे सध्या (Crime News) अशा प्रकारांना आळा घालणंही बंधनकारक झालं आहे. सध्या अशाच एक प्रकार समोर आला आहे. यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या हत्येमुळे भोर तालुक्यात खळबळ माजली होती. एका तरूणाचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आला होता आणि त्यामुळे तालुक्यात चितेंचं वातावरण पसरलं होतं. परंतु अखेर रेस्क्यू टीमला (Rescue Team) नदीत पडलेला मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. (rescue team successed maharashtra crime news today)

दागिन्यांच्या मोहापोटी वास्तुशास्त्र सल्लागार मित्राचा खून करून त्याचा पोत्यात भरून नीरा नदीत (Nira River) फेकलेला मृतदेह अखेर जवळपास 19 दिवसांनी शोधण्यात स्थानिक रेस्क्यू टीमला यश आलं आहे. निलेश वरघडे वय 43, राहणार, बिबवेवाडी असं या वास्तुशास्त्र सल्लागाराचं नाव आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर आरोपी दिपक नरळे वय 29 आणि त्याचा साथीदार रणजित जगदाळे वय 29 यांनी मृतदेह पोत्यात भरून पुणे-सातारा महामार्गवरील सारोळे येथील नीरा नदीपात्रात टाकला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हे असल्याचं निष्पन्न झालं होतं, त्यानंतर नीरा नदीत मृतदेहचा शोध सुरू होता. निलेश वरघडे हे वास्तुशास्त्र सल्लागार होते.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

कसला घडला नक्की प्रकार? 

16 ऑक्टोबरला मित्र दिपक नरळे याने निलेश यांना पुण्यातील नऱ्हे येथे एका औषध दुकानात पूजेसाठी नेले होते. मात्र निलेश यांच्या अंगावरील दागिने पहिल्यानंतर दिपकने त्यांना लुटण्याचा डाव रचला. त्यासाठी आरोपी दिपक आणि त्याचा साथीदार रणजित यांनी निलेश यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले. ते बेशुद्ध पडल्यानंतर गळा दाबून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी निलेश यांचा मृतदेह पोत्यात भरून पुणे - सातारा महामार्गावरच्या नीरा नदीत टाकून दिला.

हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक

दागिन्यांच्या लोभापायी धक्कादायक प्रकार समोर 

दरम्यान निलेश हे घरी परत न आल्याने रुपाली रुपेश वरघडे यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग असल्याची कंप्लेंट दिली. त्यानंतर बिबवेवाडी पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवत आरोपी दिपक याला ताब्यात घेतलं. चौकशीत त्याने खून केल्याची कबुली दिली. दरम्यान आरोपींनी खूनाची कबुली दिल्यानंतर, गेल्या 18 दिवसांपासून निलेश यांच्या मृतदेहचा शोध स्थानिक रेस्क्यू टीममार्फत नीरा नदीत घेण्यातं येतं होता. अखेर 19 व्या दिवशी निलेश यांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आल आहे. पोलिसांनी आरोपींकडून या आधीच मोटार, दोन दुचाकी, सोन्याचे दागिने, मोबाईल (Mobile) असा एकूण 19 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.