घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत करणार नव्या संघटनेची स्थापना

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आलेले राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत हे आज कोल्हापुरात नव्या संघटनेची स्थापना करणार आहेत. 

Updated: Sep 21, 2017, 08:18 AM IST
घटस्थापनेच्या मुहूर्तावर सदाभाऊ खोत करणार नव्या संघटनेची स्थापना title=

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आलेले राज्याचे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत हे आज कोल्हापुरात नव्या संघटनेची स्थापना करणार आहेत. 

घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड इथं नव्या संघटनेचा नारळ फोडण्यात येणार आहे. 

या कार्यक्रमाकडे राज्यातील शेतकर्याच लक्ष लागून राहिल असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोण कोणते कार्यकर्ते सदाभाऊ खोत यांच्या पाठीशी रहाणार हे पहाणे महत्वाचं ठरणार आहे.