सांगली / जळगाव : सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सांगलीत ७८ जागांसाठी ६२.१७ टक्के मतदान झालंय. सांगलीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला २० ते २५ आणि राष्ट्रवादीलाही २० ते २५ जागा मिळतील, असा अंदाज आहे... तर भाजपला १८ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला ३ ते ५ ठिकाणी विजय मिळू शकतो.
तर जळगावात कमळ फुलण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेच्या ७५ जागांसाठी ५५.७२ टक्के मतदान झालं. जळगावात मुख्य लढत भाजप आणि शिवसेनेत होतेय... या निवडणुकीत भाजपला चाळीस ते पंचेचाळीस जागा मिळतील, अशी शक्यता आहे.