Sanjay Raut On Central Govt. : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका घेण्याचं कारस्थान दिल्लीत रचलं जातंय असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut )यांनी केलाय. (Maharashtra Political News) महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर का जातायत याचा विचार राजकारण बाजूला ठेऊन व्हावा, असं राऊत म्हणाले. देशाच्या नकाशावरुन राज्याचं नामोनिशाण पुसण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला.
संजय राऊत यांनी फुटीर गटावर भाष्य टाळले. मात्र, फुटीरांच्या गटात एक शिंदे असतोच, असे संजय राऊत म्हणाले. लवकरच त्यांच्यातील अनेक जण हे ठाकरे गटात येतील, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला. तिकडे गेलेले फार दिवस तिथे राहणार नाहीत, असा दावाही राऊत यांनी यावेळी केला.दरम्यान, महाराष्ट्रात मध्यावती निवडणुका होतील. तशा हालचाली सुरु आहेत, असं सांगताना कोणता गट काय बोलतो, त्यात आपल्याला पडायचं नाही. मात्र, राज्यात मध्यावधीची तयारी सुरु झाली आहे. जे म्हणतात हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे. परंतु त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरु झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो हे लक्षात घ्या, असे मोठे विधान राऊत यांनी केलेय. त्यामुळे शिंदे गटात फूट पडण्याचे संकेत त्यांनी दिलेत.
गजानन किर्तीकर यांचा मुलगा आनंद किर्तीकर यांनी आपण ठाकरे गटातच राहणार आहोत, असं ठणकावून सांगितले आहे. अमोल किर्तीकरांनी संजय राऊतांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. राजकीय करिअरची पुढची वाटचाल ही उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार असेल. तर वडील गजानन किर्तीकर यांना शिंदे गटात जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण ते वडील शिंदे गटात जाण्यावर ठाम होते, असंही त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर यांनी आज संजय राऊतांची भेट घेतली.
वडील गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर अमोल किर्तीकर राजकारणात सक्रिय झाले आहेत. दोन दिवसांपासून अमोल किर्तीकर नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहे. गोरेगाव हा गजानन किर्तीकर यांचा पारंपरिक मतदारसंघ. याच मतदारसंघात आता अमोल किर्तीकर बैठकांमध्ये सक्रीय सहभाग घेत आहे. कालच अमोल किर्तीकरांनी गोरेगाव मध्यवर्ती कार्यालयात सुभाष देसाई यांचीही भेट घेतली होती.