Crime News: गायब झालेला मेस्सी कोण?; जाणून घ्या काय घडलं 'त्या' रात्री पुण्यात...

सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. 

Updated: Nov 13, 2022, 05:26 PM IST
Crime News: गायब झालेला मेस्सी कोण?; जाणून घ्या काय घडलं 'त्या' रात्री पुण्यात...  title=
Dog Missing in Pune news

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: आजकाल अपहरणाच्या खूप घटना आपल्याला ऐकायला मिळतात. आपल्याला कळतच नाही की अशा घटनांपासून कसं सावध राहायचं. त्यामुळे आपण अशा घटना ऐकल्यावर आपण अधिक सतर्क राहतो. सध्या अशीच एक घटना (Pune Crime News) पुण्यामध्ये घडली आहे. यावेळी कोणा लहान मुलाचे, मुलीचे अपहरण झालेले नसून यावेळी एका कुत्र्याचं (Dog Pet Parenting) अपहरण झालं आहे. ही घटना कशी घडली हे वाचून तुम्हीही चक्रावून चाल. (a dog disappers owner complaints obout the missing)

पुण्यातील कॅम्प परिसरातून सायबेरीयन हस्की प्रजातीच्या श्र्वानला एका चोरट्याने पळून नेल्याची घटना समोर आली आहे, या प्रकरणी श्र्वानाचे मालक मोजीस डिसूजा यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, डिसूजा हे सेवानिवृत्त असून कॅम्प परिसरात दस्तूर मेहेर रोडवर वास्तव्यास आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्यासह इथे राहायला आहेत. त्यांच्याकडे सायबेरियन हस्की (Husky) प्रजातीचे श्वान ज्याचे नाव त्यांनी "मेस्सी" ठेवले होते ते पाळले होते. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

काय आहे नेमकं प्रकरण? 

28 ऑक्टोबर रोजी डिसूजा (D'souza) यांचा मुलगा क्लिंटन यांनी मेसीला रात्री फिरवून आणल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर लोखंडी दरवाजाला साखळीने बांधून ठेवले होते. मात्र सकाळी सात वाजता जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा "मेस्सी" तिथे नव्हती. डिसुझा यांनी आजूबाजूच्या परिसरात मेसीला शोधलं मात्र त्यांना ती सापडली नाही. त्यांनी जवळच्या अनेक ठिकाणाहून सीसीटीव्ही (cctv) फुटेज तपासले असता त्यांना एक इसम मेस्सीला घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रार देखील दिली आहे. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

कसा लागला तपास? 

डिसूजा यांनी दोन वर्षांपूर्वी सायबेरियन हस्की प्रजातीचे श्वान 35,000 रुपयांना घेतले होते .या प्रकरणी एका अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सीसीटीव्ही चा आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. परदेशी प्रजातीचे श्वान चोरण्याच्या घटना पुण्यातील अनेक उच्चभ्रू भागात वाढल्या आहेत.