मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत. 

Updated: May 13, 2024, 10:30 PM IST
मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोप title=

Maharashtra Politics 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये दाखल झाल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ पोस्ट करत राऊतांनी खळबळजनक आरोप केलेत. दोन तासांच्या दौ-यासाठी एवढ्या जड बॅगा कशासाठी वापरल्या जात आहेत, मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असा आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ पोस्ट केलाय. तर, आम्ही मातोश्रीला ज्या बॅगा पोहचवल्या त्याचे व्हिडिओ पाहिजेत का असा पलटवार शिवसेना शिंदे पक्षाने केला आहे.

संजय राऊतांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडालेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर नाशिकमध्ये लँड झालं. मुख्यमंत्री खाली उतरले... त्यांच्यासोबत त्यांनी चार बॅगा आणल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षारक्षकांनी या जड जड बॅगा हेलिकॉप्टरमधून खाली उतरवल्या आणि मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचत्या केल्या. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण... असं सांगत राऊतांनी हा व्हिडिओ ट्वीट केला. मुख्यमंत्र्यांनी या बॅगांमधून 12 ते 13 कोटी रुपये आणल्याचा खळबळजनक आरोप राऊतांनी केला आहे.  

दरम्यान, शिवसेना शिंदे गटानं हा आरोप खोडून काढला.. एवढंच नाही तर आम्ही मातोश्रीला ज्या बॅगा पोहचवल्या, त्याचे व्हिडिओ पाहिजेत का? असा पलटवारही केला. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते  संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरशः पाऊस पडलाय. अनेकठिकाणी मतदानासाठी पैसे वाटप झाल्याचे प्रकार उजेडात आलेत. मात्र, संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच पैसे वाटप केल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केल्यानं आधीच वादाची ठिणगी पेटली होती. आता राऊतांच्या आरोपांमुळं त्यात नवी भर पडली आहे.