उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?

उदयनराजे भोसले  हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे. 

Updated: Apr 5, 2019, 08:29 PM IST
उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे? title=

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार आणि लोकसभेचे साताऱ्यातील उमेदवार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उदयनराजे हे दोनवेळा खासदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे हे अब्जावधी संपतीचे मालक असल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रावरून दिसत आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे. अनेकदा खासदारांच्या उत्पन्नात वाढ होते. मात्र, अन्य खासदारांचा विचार त्यांच्या उत्पनात घट झाली आहे.

उदयनराजे भोसले यांचे उत्पन्न २०१४ मध्ये २ कोटी ३ लाख ५१ हजार होते. तेच उत्पन्न २०१९ च्या उमेदवारी अर्जासह जोडलेल्या ताज्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी १ कोटी १५ लाखाचे उत्पन्न नमूद केले आहे. गेल्या ५ वर्षात त्यांचे उत्पन्न १ कोटी २० लाखाने कमी झाले आहे. तसेच त्यांच्यावर २३ वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. उदयनराजे भोसले आणि त्याचा पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी व्यवसाय म्हणून सुखवस्तू असे नमूद केले आहे. महत्वाचे म्हणजे बिटकोईनमध्ये दमयंतीराजे यांच्या नावाने देखील १० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

राजेंची प्रतिज्ञापत्रानुसार संपत्ती  :  

खासदार उदयनराजे भोसले यांची संपत्ती २०१९ च्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांचे २०१७/१८ चे वार्षिक उत्पन्न १ कोटी १५ लाख ७१ हजार ३०६ रुपये दाखविण्यात आले आहे. त्यांच्या वारसाप्राप्त मालमत्ता १ अब्ज ३४ कोटी ९३लाख २० हजार ५२२ इतकी आहे तर जंगम मालमत्ता १२ कोटी ३१लाख ८४ हजार ३४८  उदयनराजेंच्याकडे मर्सिडिज बेन्ज, ऑडी , इन्डिवर, मारुती जिप्सी या अलिशान गाड्या असून त्यांची किमंत ९१ लाख ७० हजार आहे.

सुमारे १ कोटी ९० लाख ३५ हजार रुपये किमतीचे सर्व कुटुंबाचे सोन्या चांदीचे दागिने दर्शविण्यात आले आहेत. उदयनराजें आणि त्यांचा कुटुंबियांचे नावे विविध बँकाचे १ कोटी २३लाख ४० हजार कर्ज आहे. त्यांची १ अब्ज १६ कोटी ३२ लाख एवढी मालमत्ता दाखविण्यात आली आहे. आताच्या प्रतिज्ञापत्रात उदयनराजे यांनी स्वतःवर ८ गुन्हे  प्रलंबित असल्याचे लिहून दिले आहे. मागील प्रतिज्ञापत्राच्या तुलनेत त्यांचे उत्पन्न सुमारे १ कोटीने कमी झाल्याचे दिसते.