नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट; शिंदे गटाचे 7 खासदार, काँग्रेसचे 9 नेते आणि मुख्यमंत्री

महायुतीमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत चर्चा नाही. अशात आता शिंदे गटाचे काही खासदार भाजपच्या चिन्हावर निवणुक लढवू शकतात. तर काँग्रेसचे काही नेते हे मुख्मंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. 

Updated: Jan 2, 2024, 04:33 PM IST
नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट; शिंदे गटाचे 7 खासदार, काँग्रेसचे 9 नेते  आणि मुख्यमंत्री  title=

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठ्या नाट्यमय घडामोडी पहायला मिळणार आहेत. नविन वर्षातील सर्वात मोठा राजकीय गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामत आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केला आहे. शिंदे गटाचे खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणुक लढवणार आहेत. तर, काँग्रेसचे नऊ नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

शिंदे गटाचे सात खासदार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचा दावा माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केलाय. तसं लेखीही या खासदारांनी दिल्याचं त्यांचं म्हणणंय. तर काँग्रेसचेच ९ लोकं मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून ते धनुष्यबाणावर लढण्यास इच्छुक असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामतांनी केलाय. 

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपली

पक्षांतरावरुन भाजप आणि ठाकरे गटामध्ये चांगलीच जुंपलीय. काँग्रेसमधले अनेक जण भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. काँग्रेसमधल्या अनेक लोकांना भाजपात येण्याची इच्छा असल्याचं विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यावरुन संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका केलीय. उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय.

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार

स्वाभीमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टींनी केलीय. मविआशी आपल्याला काहीही देणघेणं नसल्याचं त्यांनी सांगितलंय. उद्धव ठाकरेंसोबत आपण शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आलो होते असंही त्यांनी स्पष्ट केलं. तर राजू शेट्टींच्या भूमिकेचा आदर करायला हवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलीय. 

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं... शरद पवार गटाचं आव्हान

रुपाली चाकणकरांनी किमान नगरसेवक तरी होऊन दाखवावं असं थेट आव्हान शरद पवार गटाने दिलंय. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंनी हे आव्हान दिलंय. सुप्रिया सुळे गेली 15 वर्षे अजितदादांमुळेच निवडून आल्यायत. आता अजितदादा सोबत नाही म्हणून बारामतीत तळ ठोकावा लागतोय असं विधान काल रुपाली  चाकणकरांनी केलं होतं. त्यावरुनच आता रोहिणी खडसेंनी चाकणकरांवर निशाणा साधलाय.