नवी दिल्ली : भीमा कोरेगाव प्रकरणावर राज्यसभेत चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
‘गेल्या दोनशे वर्षात जे घडलं नाही ते भीमा कोरेगावमध्ये घडलं. या प्रकरणी राज्य सरकारनं अधिक लक्ष द्यायला हवं होतं’, असं पवारांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. ‘महाराष्ट्रात लवकरात लवकर शांतता नांदावी यासाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावं’, असं आवाहनही पवारांनी केलं.
तर भीमा-कोरेगावच्या हिंसाचारामागे काही अदृश्य हात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर याप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनी केलीय. दरम्यान गृहमंत्री राजनाथ सिंह यावर निवेदन देणार आहेत.