close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केलं'; शरद पवारांचा अमित शाहंना टोला

शरद पवार यांचं अमित शाह यांना प्रत्युत्तर

Updated: Sep 18, 2019, 09:10 AM IST
'तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केलं'; शरद पवारांचा अमित शाहंना टोला

सोलापूर : तुरूंगात गेलेल्यांनी सांगू नये शरद पवारांनी काय केलं, अशा शब्दात शरद पवारांनी अमित शाहांवर टीका केलीय. बरं वाईट केलं नाही म्हणून शरद पवार कधी तुरूंगात गेले नाहीत असं पवारांनी सुनावलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सोलापूरमध्ये होते, तेव्हा त्यांनी शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं? असा प्रश्न विचारला होता, या प्रश्नाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मी अजून म्हातारा झालेला नाही, अजून अनेकांना घरी पाठवायचं आहे, असंही शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या राणा जगजितसिंह यांच्यावरही पवारांनी निशाणा साधला. आपण लहान मुलांच्या वक्तव्याकडे लक्ष देत नाही असं टोमणा पवारांनी मारला.