शरद पवार अखेर पुणे पोलिसांवर कडाडले...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. 

Updated: Jun 26, 2018, 02:18 PM IST

पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुणे पोलिसांवर टीका केली आहे. बँक अधिकाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांनी अततायीपणा केल्याचा आरोप शरद पवारांनी  पुण्यात केली आहे. पुणे पोलिसांसह शरद पवारांनी राज्य सरकारवर देखील टीका केली आहे. पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर झाला असल्याचंही शरद पवारांनी म्हटलं आहे. ही पोलिसांची चूक असल्याचं शरद पवारांना म्हणायचं असल्याचं, पवारांच्या  वक्तव्यावरून दिसून येत आहे. 

बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांना पोलिसांनी अटक केली होती. यानंतर पुणे पोलिसांवर टीका होत आहे. रवींद्र मराठे हे एका आठवड्यापासून जेलमध्ये आहेत. डीएसकेंना दिलेल्या कर्ज प्रकरणातून रवींद्र मराठे यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.