शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, घेणार मोठा निर्णय

Sharad Pawar in Solapur : आगामी महापालिका निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) घेणार आहेत.  

Updated: Oct 8, 2021, 12:01 PM IST
शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, घेणार मोठा निर्णय
संग्रहित छाया

सोलापूर : Sharad Pawar in Solapur : आगामी महापालिका निवडणुका (Solapur municipal elections) कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) घेणार आहेत. काँग्रेस, शिवसेना करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असलेल्या महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Sharad Pawar's visit to Solapur)

कोठे यांच्या नेतृत्वाला पक्षातील नेत्यांनी विरोध केला नसला तरी पक्षातील काही नेते नाराज आहेत. म्हणूनच महेश कोठे यांचा पक्षप्रवेश रखडला आहे. पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील  पक्ष्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा वाद आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा हा दौरा होत आहे. ते यावेळी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

शरद पवार आज सोलापुरात आहेत. आगामी महापालिका निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, पक्षातीलअंतर्गत वादावर यावेळी पडदा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याची शक्यता राष्ट्रवादीकडून वर्तवली जात आहे. कोठे यांच्या नेतृत्वाला पक्षातील नेत्यांनी विरोध केला नसला तरी दबक्या आवाजात कुजबूज सुरु आहे. यापार्श्वभूमीवर या दौऱ्यारा महत्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, पवार सोलापुरात येताच पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.