Shirdi Lok Sabha Result 2024 in Marathi : शिर्डीत महाआघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा केला पराभव आहे. शिर्डीत पराभव हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रतीष्ठेची केलेली जागा गमावली आहे. शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दोन टर्म खासदार राहिलेल्या सदाशिव लोखंडे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी पराभव केला आहे. साधारण 57 हजार मतांनी वाकचौरे विजयी झाले आहेत. वाकचौरेंनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मतदारसंघ आणी अकोले विधानसभेतून वाकचौरेंना भरघोस लिड मिळाली आहे.
शिर्डी लोकसभेच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच पहायला मिळाली होती . दोन्ही गटाकडून शिर्डीच्या जागेवर दावा करण्यात आला होता. विद्यमान खासदार शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे असले तरी ठाकरे गटानं शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. 2009मध्ये वाकचौरेंनी शिर्डी मतदाससंघातून आठवलेंचा पराभव केला होता, तर अनेक टर्म शिर्डी लोकसभा जागा काँग्रेस लढवत असल्यामुळे काँग्रेसनंही शिर्डीच्या जागेवर दावा ठोकला होता. अखेरीस महाविकासआघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्यात तिरंगी लढत झाली.
ENG
471(113 ov)
|
VS |
IND
209/3(49 ov)
|
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.