राहता : स्वच्छतेच्या नादात राहाता नगरपालिकेला माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. कच-याच्या ट्रॅक्टरमध्ये एका मनोरुग्णाला नेल्याचं या व्हिडिओत दिसतंय. एका जिवंत माणसाला कच-याच्या गाडीत अर्धनग्न अवस्थेत टाकून गावातून नेताना कर्मचारी दिसताहेत.
माणूस आहे हे ही कर्मचारी विसरलेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्या व्यक्तीला मनोरुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याऐवजी गावापासून ८ किलोमीटर लांब असलेल्या कचरा डेपोवर सोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.