मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण, डोक्याला १३ टाके

Updated: Apr 7, 2018, 08:38 PM IST

शिर्डी : शालेय कामं सांगितल्याचा राग येऊन उपशिक्षिकेनं मुख्याध्यापिकेला बेदम मारहाण केल्याची घटना, शिर्डी जवळच्या नांदुर्खीमधल्या चौधरी वस्तीतल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली. यात मुख्याध्यापिका जानकी गवळी यांच्या डोक्याला 13 टाके पडले असून, मारहाण करणा-या उपशिक्षिका अकीलाबी सय्यद विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.