बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका

Updated: Mar 28, 2022, 08:28 PM IST
बीड नगरपालिका निवडणुकीच्याआधी शिवसेनेचा राष्ट्रवादीला जोरदार झटका title=

बीड : बीडमध्ये आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बीड शहरातील नगरपालिकेच्या समोर भव्य प्रवेश सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर  (Sandeep Kshirsagar) यांना जोरदार धक्का दिला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्य़ा उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे अनेक समर्थक शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यामुळे बीड नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला मोठा झटका बसला आहे. 

बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढणार आहे. बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.

जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारुख पटेल, बाबूशेठ लोढा, नितिन लोढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.