मुंबई : शिवसेनेतली सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर अनेक आमदार नॉट रिचेबल आहेत. नॉट रिचेबल असणारे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरत येथील हॉटेलवर असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. सूरतच्या द ग्रँड भगवती हॉटेलमध्ये काही आमदारांची बैठक झाली. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यासह द ग्रँड भगवतीमध्ये शिवसेनेचे 17 आमदार असल्याची माहिती आहे. हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याची माहिती सूत्रांची आहे.
दरम्यान, शिवसेना नाराज आमदार आणि शिंदे नॉट रिचेबल असल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा संपर्क करण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाकडून आपआपल्या आमदारांना संपर्क तात्काळ सुरु केला आहे.
नितीन देशमुख
विश्वनाथ भोईर
किशोर पाटील
महिला आमदार लता सोनवणे (दिल्लीत)
तानाजी सावंत
चंद्रकांत पाटील (अपक्ष)
संजय राठोड
प्रताप सरनाईक
राजन साळवी
योगेश कदम
प्रकाश सुर्वे
बालाजी किणीकर
महेंद्र दळवी
भरत गोगावले
महेंद्र थोरवे