Shivsena Symbol : ठाकरेंची 'शिवसेना' इतिहासजमा होणार? पाहा कायदेतज्ज्ञ काय म्हणतात...

शिवसेनेचं मागील 5 दशकाचं अस्तित्व आता मिटणार की काय?

Updated: Oct 8, 2022, 11:23 PM IST
Shivsena Symbol : ठाकरेंची 'शिवसेना' इतिहासजमा होणार? पाहा कायदेतज्ज्ञ काय म्हणतात... title=

Shivsena : महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील मोठी घडामोड आज घडली. शिवसेनेचं अस्तितव असलेलं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्यात आलं आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. अशातच आता शिवसेने इतिहासजमा होणार का?, असा सवाल उपस्थित होताना दिसतोय. त्यावर आता कायदेतज्ज्ञांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

श्रीहरे अणे काय म्हणतात?

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ श्रीहरे अणे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय अनपेक्षित नव्हता, असं श्रीहरे अणे यांनी म्हटलं आहे. प्रत्येत काळ सारखा नसतो. काळ पुढे जात असतो. त्यामुळे शिवसेनेचं जुनं चिन्ह धनुष्यबान चिन्ह संपुष्टात येईल आणि दोन्ही गटाला आता नव्याने शुन्यातून सुरूवात करावी लागेल, असं कायदेतज्ज्ञ श्रीहरे अणे यांनी म्हटलं आहे. 

डॉ. उल्हास बापट काय म्हणाले? 

महाराष्ट्रात सध्या जे चाललं आहे ते सर्व गुंतागुंतीचं आहे. त्याला कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयात 16 जणांच्या अपात्रतेची केस सुरू आहे. तर दुसरीकडे स्पीकरचे अधिकार काय आहेत, यावर अद्याप स्पष्टता नाही. असं असलं तरी निवडणूक आयोगाला कोणते अधिकार आहेत, हे आता निश्चित झालंय, असं बापट म्हणाले.

शिंदे गटाला कायदेमंडळात बहुमत आहे, यात काही वाद नाही. मात्र, संस्थात्मकदृष्ट्या कोणाचं बहुमत आहे, हे ठरलेलं नाही. संस्थात्मकदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत असावं, असं सध्या अंदाज लावला जातोय. गोंधळाच्या परिस्थितीत पोटनिवडणूक आल्याने निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावा लागला. हे चिन्ह तात्पुरतं गोठवण्यात आलंय. हा अंतिम निर्णय नाही, असंही उल्हास बापट म्हणाले.

आणखी वाचा - धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटापुढे 'या' चिन्हांचा पर्याय, वाचा सविस्तर

एकूण परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाना अंतिम निर्णय घेण्यासाठी 4 ते 6 महिने लागतील, अशी माहिती देखील बापट यांनी दिली आहे. शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलं गेलेलं चिन्ह आणि नाव वापरता येणार नसल्याने आता उद्धव ठाकरे यांना मोठा दणका बसला आहे. त्यामुळे शिवसेनेचं मागील 5 दशकाचं अस्तितव आता मिटणार की काय?, अशी चिंता शिवसैनिकांना वाटत आहे.