असहाय्य बापाला हेच कळत नव्हतं...बायको वारली म्हणून रडू... की मुलगा आईच्या शेवटच्या भेटीलाही आला नाही म्हणून रडू...

आई आणि तिच्या मुलांचं नातं हे कोणत्याही नात्यापेक्षा घट्टं असते आणि आई आपल्या मुलावर कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करते.

Updated: Apr 21, 2021, 02:54 PM IST
असहाय्य बापाला हेच कळत नव्हतं...बायको वारली म्हणून रडू... की मुलगा आईच्या शेवटच्या भेटीलाही आला नाही म्हणून रडू...

सांगली : आई आणि तिच्या मुलांचं नातं हे कोणत्याही नात्यापेक्षा घट्टं असते आणि आई आपल्या मुलावर कोणतीही अपेक्षा न ठेवता प्रेम करते. परंतु कधी कधी लोकं इतकी निर्दयी होतात की, आपल्या जन्मदात्या आईचाही विचार करत नाही. आपल्या आईच्या मृत्यूची बातमी फोनवर ऐकून एखादा मुलगा कसा काय हे वाक्य बोलू शकतो? हेच कळत नाही.

तो मुलगा म्हणाला की, "तुम्हाला अंत्यसंस्कार वैगरे काय करायचे आहे ते करा, तुम्ही तिथेच काय ते पाहून घ्या. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मला काहीही सांगू नका."

हे वाक्य वाचल्यावर तुम्ही दोन मिनिटासाठी थक्क व्हाल. तुम्हाला वाटेल की, ही बातमी खोटी आहे. यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. परंतु दुर्दैवाने ही बातमी खरी आहे. महाराष्ट्रामधील सांगली जिल्ह्यातील ही घटना आहे.  येथे एका मुलाने आपल्या वृद्ध आईच्या अंत्यसंस्कारांची जबाबदारी पार पाडली नाही. शेवटी, काही सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांनी त्यांच्या खर्चातून अंतिम संस्कार केला.

या नालायक मुलाचे दुर्दैवी वडील या गोष्टीचे साक्षीदार आहेत. ते वडील यामध्ये असहाय आहेत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, परंतु या व्यतिरिक्त ते काहीही करु शकत नाही.

जेव्हा त्या म्हाताऱ्या आईची प्रकृती अचानक बिघडली. तेव्हा तिला जाट मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. यानंतर डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यावेळेस कोणताही नातेवाईक त्या म्हाताऱ्या आई बरोबर यायला तयार नव्हता.

शेवटी त्या म्हाताऱ्या आईचा म्हातारा नवराच त्या गाडीत बसला. सांगली जवळ येताच गाडीमध्येच त्या म्हाताऱ्या आईचा मृत्यू झाला. अशा वेळी जिल्ह्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश यांनी त्या म्हाताऱ्या आईच्या मुलाला फोन करुन बोलावले. तेव्हा त्या मुलाचे उत्तर आले, "तुम्हाला अंत्यसंस्कार वैगरे काय करायचे आहे ते करा, तुम्ही तिथेच काय ते पाहून घ्या. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मला काहीही सांगू नका."

आईचे निधन, वडील दुखावले… मुलगा नालायक निघाला!

हे उत्तर ऐकून सामाजिक कार्यकर्ते योगेश यांनी त्या म्हाताऱ्या आईच्या नवऱ्याकडे पाहिले. त्याची अवस्था तर अधीकच वाईट होती. त्यांनी योगेश यांच्या समोर आपले दोन्ही हात जोडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, "काय करु मी आता, माझ्याकडे इतके पैसे नाहीत. शक्य असल्यास, तुच माझ्या पत्नीवर अंत्यसंस्कार कर. तुला पुण्य लाभेल."

यानंतर त्या म्हाताऱ्या बाबांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. योगेश विचार करू लागले की, कदाचित त्यांच्या मुलाने त्यांना साभाळेले असते प्रेम केले असते तर यांच्यावर आज अशी वेळ आली नसती. त्यांच्या मुला मुळेच आज त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

यानंतर योगेश यांनी ठरवलं की, आपण या म्हाताऱ्या आईचे अंत्यसंस्कार करायचे. या कामात त्यांना स्थानिक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक, नगरसेवक यांनी मदत केली.

जेव्हा सामाजिक कार्यकर्ते योगेश यांनी त्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी आणि तिच्या चितेला अग्नी देण्यासाठी बाजूला उभे असलेल्या म्हाताऱ्या बाबांना हाक मारली, तेव्हा ते बाब हात जोडून म्हणाले, "तुम्ही आमच्यासाठी देव आहात." त्यानंतर त्यांच्या डोळ्यातून आश्रुंच्या धारा वाहू लागल्या. त्यांचे डोळे बरेच काही सांगत होते. परंतु ते म्हातारे बाबा असहाय होते ते काहीही न बोलता त्यांचे डोळे आणि अश्रू बरेच काही सांगत होते.