महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोणाची भलतीच दहशत? आतापर्यंत 4 बळी गेल्याचा संशय

तिथे महाराष्ट्रात एकिकडे कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळं नवं संकट राज्यावर घोंगावताना दिसत आहे. नागपुरात मात्र एक वेगळीच दहशत पाहायला मिळत हे. या दहशतीमुळे आतापर्यंत काहीजणांना जीवाला मुकावं लागल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

Updated: Jun 9, 2022, 01:44 PM IST
महाराष्ट्राच्या उपराजधानीत कोणाची भलतीच दहशत? आतापर्यंत 4 बळी गेल्याचा संशय title=
प्रतिकात्मक छायाचित्र

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : तिथे महाराष्ट्रात एकिकडे कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळं नवं संकट राज्यावर घोंगावताना दिसत आहे. नागपुरात मात्र एक वेगळीच दहशत पाहायला मिळत हे. या दहशतीमुळे आतापर्यंत काहीजणांना जीवाला मुकावं लागल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. 

जुनचा पहिला आठवडा लोटला तर पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम आहे. नागपुरातील पारा गेल्या आठवडाभरापासून 45 अंशाच्या जवळपास आहे. उष्णतेच्या या प्रकोपामुळे नागपूर शहरातील विविध भागात गेल्या तीन दिवसात उष्माघाताने 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाने कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. मान्सून राज्याच्या वेशीवर आलेला असताना दुसरीकडे विदर्भात मात्र सूर्यनारायणाचा प्रकोप काही कमी झालेला नाही. पूर्व विदर्भात तर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात पारा 45 ते 46 च्या दरम्यान तडाखा देत आहे. यामुळे या जिल्ह्यातल्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागपुरात तर गेल्या तीन दिवसात उष्माघाताने चार जणांचा बळी घेतल्याचा संशय आहे.

शहरातील विविध भागात अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण मात्र पोस्टमार्टमच्या अंतिम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

उन्हाचा तडाखा जीवावर उठला?

नागपुरात सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छावणी बस स्टँड जवळ 8 जूनला 45 वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत आढळली. डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.तर याच दिवशी अजनी पोलीस स्टेशन हद्दीत टीबी वॉर्ड परिसरात 37 वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यानाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
तर 7 जूनला गड्डीगोदाम येथे 50 वर्षीय पुरुष आणि 6 जूनला गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत अशोक चौक येथेही 50 वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते.

या दोघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या सर्व मृत्यू मागे नेमके कारण पोस्टमार्टमच्या अंतिम अहवालानंतर स्पष्ट होईलच मात्र नागपुरातील तीव्र उन्हाळा आणि गर्मी आणि त्यामुळे उष्माघात त्यांच्या मृत्यूचेसाठी कारणीभूत ठरले नाही ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.