फेसबुक-इन्स्टाची चूक दाखवा आणि जिंका 22 लाख !

मराठी मुलाने करुन दाखवलं. जे फेसबुक-इन्स्टग्रामला जमले नाही ते सोलापूरमधील बार्शीच्या मयूर फरताडे यांने सहज शक्य करुन दाखवले आहे.  

Updated: Jun 18, 2021, 08:00 PM IST
फेसबुक-इन्स्टाची चूक दाखवा आणि जिंका 22 लाख !

अहमद शेख, सोलापूर : मराठी मुलाने करुन दाखवलं. जे फेसबुक-इन्स्टग्रामला जमले नाही ते सोलापूरमधील बार्शीच्या मयूर फरताडे यांने सहज शक्य करुन दाखवले आहे. मयूर याने फेसबुक इन्स्टग्रामवरचा बग ( bug ) शोधून काढला आहे. त्यामुळे करोडो लोकांची प्रायव्हसी सेफ राहिली आहे. त्यामुळे फेसबुक-इन्स्टग्रामने (Facebook and Instagram) त्याला 22 लाखांचे बक्षीस दिले आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल कौतुक करण्यात येत आहे. (Mayur Fartade from Barshi discovered the bug on Facebook and Instagram)

मयूर फरताडे याने फेसबुक इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून फेसबुकला कळवला. हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचे बक्षीस दिले आहे. भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे, हे आपल्याला माहिती आहे काय?

जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेलही त्याला पाठविला आहे.

मयूर फरताडे याने त्याच्या कमतरता सांगून अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचवलं आहे. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खासगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फॉलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक आणि इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटीची माहिती 16 एप्रिलला दिली होती. कंपनीने 15 जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे

बार्शी तिथं सरशी म्हणतात ते काही खोटं नाही, बार्शी ही विविध नाविन्यपूर्ण कल्पनांची आणि खाण आहे. त्याच्यातून मयूरसारखे हिरे सतत निपजत  असतात, फक्त त्याकडे शासन, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.