मुंबई : राज्यात लागू करण्यात आलेल्या नव्या निर्बंधा अंतर्गत राज्यातील अनेक देवस्थान भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्याला आता मंदिर समितीकडूनही लागू करण्यात आला आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरासह देवस्थान समितीच्या आखत्यारीतील सर्व मंदिरे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जोतिबाची चैत्र यात्रा देखील रद्द करण्याचा देवस्थान समितीने निर्णय घेतला आहे.
कडक नियमांतर्गत आज रात्री 8 पासून पुढील आदेशापर्यंत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिर्डी येथील साईमंदिर देखील दर्शनासाठी बंद राहणार आहे. आज रात्री 8 वाजेपासून मंदीर बंद ठेवण्याचा साई संस्थानने निर्णय जाहीर केला आहे. साई संस्थानचे प्रसादालय आणि भक्त निवासही या काळात बंद राहणार आहे. संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांची पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.