संतापजनक! आधी कपडे काढायला लावले... फोटो काढायला आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडं कृत्य

Solapur Crime : फोटो काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार सोलापुरातील अक्कलकोटमध्ये घडला आहे. लायक अली नदाफ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास करत आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 11, 2023, 04:44 PM IST
संतापजनक! आधी कपडे काढायला लावले... फोटो काढायला आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत घाणेरडं कृत्य title=
(फोटो - freepik.com)

Crime News : सोलापुरात (Solapur Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेत लागणाऱ्या ओळखपत्रासाठी फोटो काढायला गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत फोटोग्राफरने गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आठवीत शिकणारी मुलगी फोटो काढायला गेलेली असताना तिचे कपडे उतरवून तिच्या शरीराला स्पर्श केल्याप्रकरणी फोटोग्राफरवर (Photographer) पोक्सो कायद्याअंतर्गत (Pocso Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास अक्कलकोट तालुक्यातील एका गावात हा सगळा प्रकार घडला. पोलिसांनी  (Solapur Police) आरोपीला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध  भादंवि 354 , 354 (ब) व पोक्सो 8 व 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लायक अली नदाफ असे अटक करण्यात आलेल्या फोटोग्राफरचे नाव आहे. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पीडित मुलगी शाळेतल्या ओळखपत्रासाठी फोटो काढण्यासाठी गावातल्या फोटो स्टुडिओमध्ये गेली होती. त्यावेळी फोटोग्राफर लायक अली नदाफ याने मुलीला कपडे उतरवण्यासाठी सांगितले. कपडे काढून फोटो घे, असे म्हणत त्याने मुलीच्या अंगावरील कपडे काढले. त्यानंतर त्याने मुलील्या शरीराला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मुलीने या सगळ्या गोष्टीला विरोध केल्यानंतर आरोपीने तिला धमकी दिली. हा प्रकार घरात कुणालाही सांगू नकोस, अन्यथा तुला सोडणार नाही असे आरोपीने म्हटले.

त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या आईला जाऊन सांगितला. आईने स्टुडिओत जाऊन नदाफ याला जाब विचारला. त्यानंतर तो विनवणी करू लागला. माझ्याकडून चूक झाली, माफ करा, यापुढे असे करणार नाही, असे त्याने पीडित मुलीच्या आईला सांगितले. ही बातमी समजताच गावकऱ्यांनी आरोपी नदाफला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.