जवान बनला देवदूत ! पुरात अडकलेल्या प्रवाशांचे स्थानिकांच्या मदतीने वाचवले प्राण

जवानाने प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.

Updated: Jul 9, 2022, 11:31 PM IST
जवान बनला देवदूत ! पुरात अडकलेल्या प्रवाशांचे स्थानिकांच्या मदतीने वाचवले प्राण title=

चंद्रपूर : वरोरा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी गेली वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात हलगर्जीपणाने गाडी नेली. या गाडीत एकूण 5 लोकं होते. 

जिल्ह्यात विविध तालुक्यात दिवसभर कमी-अधिक मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. ही गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. गावातील नागरिकांसह सैन्यात असलेल्या निखिल काळे नामक जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबवले. 

जवान आणि स्थानिकांनी दाखविलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका केली. प्रसंगावधान राखून केलेल्या बचावकार्याचे कौतुक केले जात आहे.