सोनम वाघीणीचा शिकार करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Updated: Apr 9, 2018, 08:00 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूरमधल्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या सोनम वाघिणीच्या शिकारीचा एक व्हिडिओ, सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे.

तेलिया धरण परिसरातली अनभिषिक्त राणी असलेल्या सोनम वाघिणीनं या भागात सांबराची शिकार केली होती. व्हायरल झालेला हा व्हिडिओ, याच भागात शिकार केल्यावर ओढून नेल्याच्या घटनेचा आहे. 

या भागात असलेली सोनम वाघीण ४ बछड्यांची आई आहे. आपल्या बछड्यांना भरवण्यासाठी सोनमला दर ४ दिवसांनी शिकार करावी लागते. याच भागातला बजरंग नावाचा वाघ हा तीचा जोडीदार आहे. 

आपल्या कुटुंबासाठी सांबराची शिकार करुन पर्यटकांच्या गर्दीतून ऐटीत शिकार घेऊन जात असल्याचा सोनम वाघीणीचा हा व्हिडिओ कॅमे-यात कैद झाला. सोनमच्या या धाडसाने पर्यटक मात्र आश्चर्यचकित झाले.