आंदोलन सुरु असताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसीटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारात ही घटना घडली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 18, 2017, 04:34 PM IST
आंदोलन सुरु असताना एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू title=

अहमदनगर : ऐन दिवाळीत सुरू असलेल्या एसीटी कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान एका कर्मचाऱ्याचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारात ही घटना घडली.

एकनाथ विठ्ठल वाकचौरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विठ्ठल हे एसटी आगारात वाहक या पदावर कर्यरत होते. ते ५२ वर्षांचे होते. आंदोलन सुरू असतानाच हृयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. एसटी आंदोलनातील हा पहिला बळी आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.

दरम्यान, संप सुरू असताना आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे संपाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्याच्या मृत्यूला सरकार आणि प्रशासनच जबाबदार असल्याचा दावा कर्मचारी संघटनांनी केला आहे.