कोरोना विरोधातील लढ्यात राज्यासाठी सकारात्मक बातमी

वाचा ही सविस्तर माहिती... 

Updated: Oct 26, 2020, 11:05 PM IST
कोरोना विरोधातील लढ्यात राज्यासाठी सकारात्मक बातमी
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : देशभरात coronvirus कोरोना रुग्णांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणांच्या पुढं तरीही किमान काही अंशी कोरोनाचा प्रभाव काही भागांमध्ये कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा वेग हा शंभर दिवसांच्याही पलीकडे गेलेला असतानाच इथं महाराष्ट्रातही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय सोअनेक आव्हानं उभी करत असतानाच काहीसा दिलासाही मिळू लागला आहे. पूर्णणे नसला मवारी मागील तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आल्याची नोंदही करण्यात आली आहे.

सोमवारी राज्यात एकूण ९,९०५ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर राज्यात आजपर्यंत एकूण १४,७०,६६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती समोर आली आहे. ही एकंदर आकडेवारी पाहता यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले आहे.

सोमवारी राज्यात ३,६४५ नवीन रुग्णांचे निदान झाले. तर ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.

 

कोरोनासंदर्भातील माहितीनुसार आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,४५,१९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४८,६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २५,३०,९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर आज रोजी एकूण १,३४,१३७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ही सर्व आकडेवारी सकारात्मक बदलांचीच अनुभूती देणारी असली तरीही कोणत्याही बाबतीत हलगर्जीपणा परिस्थिती बिघडवू शकतो. त्यामुळं सर्व नियमांचं पालन करत कोरोनाला नमवण्यासाठी पावलं उचलण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.