बोंड अळीग्रास्त कापूस उत्पादकांना सरकार देणार मदत

राज्यातील बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. बोंड अळीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आर्थिक मदत देणार आहे.

Updated: Dec 23, 2017, 08:57 AM IST
बोंड अळीग्रास्त कापूस उत्पादकांना सरकार देणार मदत title=

नागपूर : राज्यातील बोंड अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी. बोंड अळीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आर्थिक मदत देणार आहे.

आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादीत

कोरडवाहू कापूस उत्पाद शेतकऱ्यांना हेक्टरी ३०,८०० रुपये तर बागायतदार कापूस उत्पादकांना हेक्टरी ३७,५०० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादीत असणार आहे. कापूस उत्पादकांप्रमाणेच धान उत्पादकांनाही राज्य सरकार आर्थिक मदत देणार आहे. कोरडवाहू धान उत्पादकांना हेक्टरी  ७,९७० रुपये तर बागायतदार धान उत्पादकांना  हेक्टरी १४,६७० रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक मदत दोन हेक्टरपर्यंत मार्यादीत असणार आहे. तसेच धानाला प्रति क्विंटल 200 रुपये बोनस दिला जाणार असून 50 क्विंटलपर्यंत हा बोनस मर्यादीत असणार आहे.

कपाशीच्या प्रत्येक हिरव्या बोंडात सेंदरी आळीचा प्रादुर्भाव आढळत असल्याने कपाशी तोट्यात जाण्याची शक्यता आहे. अधिक उत्पादनासाठी आणि रोग कीड आळया येऊ नये म्हणून बीटी तंत्रज्ञान शासनाने तयार केलं होतं, पण बोंडातच अळी झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. दहा दहा एकर कापसाची लागवड करून लाखो रुपये खर्च केलेल्या मोठ्या आणि छोट्या शेतकऱ्यांचा लागवड खर्च सुद्धा फिटत नाहीय. त्यामुळे शेतकरी आता पंचनामे करून शासनाकडून मदतीची अपेक्षा करू लागलेत.

जे बीटी तंत्रज्ञानच कपाशीवर रोग कीड आणि आळयांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तयार करन्यात आलं, त्याच बीटी वर प्रत्येक बोंडात आळया निघत असल्याने या सगळ्या स्थितीला नेमक जबाबदार कोण, ज्यांनी कुणी शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडवली त्या सगळ्या दोषींवर कठोर कारवाई करणायची मागणी शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे.