कपिल पाटील, झी मीडिया, ठाणे : मोबाईलमुळे आता पोटाचे विकार वाढू लागले आहेत, अशी धक्कादायक माहिती समोर आलीय, आश्यर्य वाटतंय ना, परंतु हे नकळत आपल्या आयुष्यात घडत आहे. मोबाईलच्या अधिक वापराचे अनेक तोटे आपण पाहिलेत, परंतु आता त्यामुळे पोटाचे आजार वाढत आहेत, अशी धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिलीय.
सर्वांची दिवसाची सुरवातच आता मोबाईलमुळे होत आहे. मोबाईल काही काळ आपल्या जवळ नसेल तर लोक बैचैन होतात.असेच चित्र सर्वत्र आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे अनेक तोटे समोर आलेत, आणि आता तर मोबाईलमुळे पोटाच्या आजरा वाढू लागलेत, हे ऐकून आश्चर्यचा धक्का वाटत ना !
हो पण हे घडतेय, नकळत घडतेय आपल्या आयुष्यात, अगदी सर्वांच्याच, सकाळी उटल्यावर पहिल्यांदा आपण मोबाईल घेतो, आणि टॉयलेट ला जातो आणि टॉयलेटमध्ये आपण मोबाईलवर कार्यरत होतो आणि त्यामुळे आपण टॉयलेटवर लक्ष केंद्रित करत नाही.
टॉयलेट प्रक्रिया त्यामुळे अर्धवट राहते, आणि मग पुन्हा पुन्हा आपण दिवसभरात टॉयलेटला जावे लागते, आणि या अर्धवट राहिलेल्या टॉयलेटच्या प्रक्रियेमुळे अनेक पोटाचे आजार उदभवतात, त्यात गॅस होणे, मूळव्याध, अल्सर असे पोटाचे अनेक आजार निर्माण होतात, आणि पुढे जाऊन हेच आजार कॅन्सर पर्यंत जातात.
तसेच या मोबाईलमुळे अनेक मानसिक आजार ही जडले जात आहेत, काहींना मोबाईल टॉयलेट मध्ये घेऊन जात नाही, तोपर्यंत टॉयलेट होत नाही, अशी मानसिकता अनेकांची आहे. हा एका प्रकारचा हा मानसिक आजरा आहे. आणि यावर उपाय म्हणजे टॉयलेटला जाताना मोबाईल वापरू नये, असा सल्ला यावर डॉक्टर देत आहेत.
तर लोकांनीही ही मान्य केले आहे की अशा सवयी त्यांना आहेत, ते की मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जातात.
मोबाईलचे अनेक दूरुपयोग आपण पाहिलेत, त्याचे दुष्परिणाम ही पाहिलेत. परंतु आता मोबाईलमुळे असे विकार जर जडत असतील, तर मोबाईलचा उपयोग योग्य तेवढाच आणि योग्य वेळी करणेच गरजेचे आहे !