पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाची ठिणगी

ऊस वाहतूक करणारे ट्रक अडवले.

Updated: Nov 15, 2019, 08:11 AM IST
पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाची ठिणगी title=

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होत असताना पश्चिम महाराष्ट्रात ऊस आंदोलनाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री अडवले. करवीर तालुक्यातील परिते ठिकपुर्ली फाट्यानजीक ऊस वाहतूक करणारे ट्रक अडवून सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यावेळी ट्रकच्या टायरमधील हवा देखील कार्यकर्त्यांनी सोडून दिली. 

कोल्हापूर जिल्ह्यात कुठलाही साखर कारखाना सुरू नसताना डी. वाय. पाटील साखर कारखान्यानं दादागिरी करून ऊस पळवण्याची कामं सुरू केल्याचं या आंदोलकांच म्हणणं आहे. जोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद होत नाही तोपर्यंत उसाचे कांडे तोडू न देण्याची भूमिका स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.