राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा
ऊस दरासाठी आंदोलन करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
Jan 16, 2015, 05:46 PM ISTमुंबईत शरद पवारांची पत्रकार परिषद, शेट्टींवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 16, 2015, 01:58 PM ISTशरद पवारांची पत्रकार परिषद, राजू शेट्टींना टोकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 15, 2015, 05:40 PM ISTसाखर आयुक्त पैसे गोळा करण्यात दंग - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी, पुणे साखर संकुल तोडफोड प्रकरणी साखर आयुक्त बिपीन शर्मा यांनाच जबाबदार धरलंय. भ्रष्ट साखर आयुक्त बिपीन शर्मा पैसे गोळा करण्यात गुंतले असल्याचा थेट आरोप करताना, सरकार त्यांना हटवत का नाही असा सवाल राजू शेट्टी यांनी केलाय.
Jan 13, 2015, 02:23 PM ISTऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी
यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.
Nov 8, 2013, 10:49 PM ISTऊसाला २५०० रूपये भाव
सांगली जिल्ह्यतील इस्लामपूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांची काल बैठक झाली. यात ऊसाला प्रतिटन २५०० रुपयाचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हा दर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मान्य केला असून, उसाचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
Nov 19, 2012, 03:36 PM ISTऊस आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात ऊस आंदोलन काही थांबताना दिसत नाहीये. जिल्ह्यातील ३० हून अधिक गावांमध्ये आज निषेध मोर्चा आणि बंद पाळण्यात आला. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांत धुमश्चक्री झाली.
Nov 15, 2012, 08:37 PM ISTऊस आंदोलन चिघळलं, एसटी सेवा पुन्हा बंद
ऊसदर आंदोलनामुळं पश्चिम महाराष्ट्रात सकाळी सुरु करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. आंदोलनामुळं सांगली एसटी सेवा पुन्हा बंद करण्यात आलीये. सांगली-इस्लामपूर मार्गावर रास्ता रोको करण्यात आला.
Nov 14, 2012, 05:45 PM ISTपेटवा पेटवी
काही प्रश्न सोडविण्याऐवजी ते धगधगत कसे राहतील यावर भर दिला जातो. किमानपक्षी जर प्रश्न सोडवता येत नसतील तर भाष्य करून किंवा आपणच तारणहार म्हणून त्यात डोकं खुपसू नये आणि पेटवा पेटवीची भाषा करू नये. यात शेतकरी आणि सरकारचे हित साध्य होत नाही, हेच खरे आहे.
Nov 14, 2012, 05:33 PM ISTऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली
ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.
Nov 14, 2012, 12:24 PM ISTप. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.
Nov 14, 2012, 10:35 AM ISTखासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये
ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.
Nov 13, 2012, 09:24 AM IST