व्हिडिओ : कणिक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

पुण्यात एका विचित्र अपघातात एका ४० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 

Shubhangi Palve Updated: Apr 9, 2018, 08:49 PM IST

पुणे : पुण्यात एका विचित्र अपघातात एका ४० वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागलाय. 

गोखले नगर परिसरात ही दुर्दैवी घटना घडलीय. कणीक मळण्याच्या यंत्रात ओढणी अडकून सुप्रिया प्रधान यांचा मृत्यू झाला. या अपघातात सुप्रीया यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. 

अपघातानंतर तत्काळ सुप्रीया यांना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आलं. मात्र, हॉस्पीटलमध्ये पोहचण्याआधीच त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता.