9 वर्षांपासून अंथरुणावर खिळलेली ५० वर्षीय महिला स्वःतच्या पायावर उभी, डॉक्टरांची कमाल

Surgery : ​9 वर्षांपासून अंथरुणावर खिळलेली ५० वर्षीय महिला स्वःतच्या पायावर उभी राहिली आहे. ही किमया डॉक्टरांनी करुन दाखवली आहे. 

Updated: Mar 31, 2021, 03:52 PM IST
9 वर्षांपासून अंथरुणावर खिळलेली ५० वर्षीय महिला स्वःतच्या पायावर उभी, डॉक्टरांची कमाल title=

मुंबई : Surgery : 9 वर्षांपासून अंथरुणावर खिळलेली ५० वर्षीय महिला स्वःतच्या पायावर उभी राहिली आहे. ही किमया डॉक्टरांनी करुन दाखवली आहे. संधीवातासह फुफ्फुस विकार आणि इतर आजारांमुळे गुंतागुंत असूनही या महिलेवर पुण्यातील जहांगीर हॉस्पीटलमध्ये (Jehangir Hospital) गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया (successful knee surgery) करण्यात आली आहे. त्यामुळे ही महिला स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. 

कोथरुड येथील जहांगीर हॉस्पिटल गंभीर संधिवात आणि एकाधिक कोमॉर्बोडीटिज असलेल्या एका महिलेचा पूर्ण गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. फुफ्फुसातील तंतुमय रोग, उच्च रक्तदाब, ऑस्टिओलिसिस समस्यांमुळे गेल्या 9 वर्षांपासून अंथरुणाला खिळलेली ही महिला रुग्ण आता कोणत्याच आधाराशिवा उभी राहू शकत आहे. 

डोंबिवली येथील रुग्ण कुसुम शेले या गृहिणी यांना संधिवात झाल्याचे निदान झाले. त्यानंतर त्यांची शारीरिक हालचालींवर दुष्परिणाम झाला. चालणे, खुर्चीवरुन उठणे किंवा बसणे या अगदी सोप्या शारीरीक हलचाली देखील त्यांना एकटीने करणे शक्य होत नव्हते. याकरिता त्यांना नेहमी आधारा घ्यावा लागत असे. अनेक रुग्णालयात धाव घेत त्यांनी उपचाराकरिता प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी ठरले नाही. पुण्यातील कोथरुड येथील जहांगीर हॉस्पीटलमध्ये त्यांनी डॉ. आशिष अरबट यांच्याकडे उपचारास सुरुवात केली आणि त्यांना एक नवे आयुष्य मिळाले. 

हॉस्पिटलचे जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ. आशिष अरबट म्हणाले, संधिवात झाल्यामुळे तसेच ऑस्टियोआर्थरायटिसमुळे शारीरिक हालचाली होत नसल्याने रुग्णाचा गुडघा खूप खराब होता. गेल्या 9 वर्षांपासून रुग्णामध्ये गुडघेदुखी, पाठीचा कणा वाकणे, उच्च रक्तदाब आणि फुफ्फुसाचे रोग विकसित होत केले. अशा रुगणावर उपचार करणे अतिशय आव्हानात्मक बाब होती. गुडघे प्रत्यारोपणाची अचूक पध्दत वापरून रोबोअलीगन तंत्रज्ञानाच्या मदतीने शस्त्रक्रिया करण्यात आली.

कुसुम शेले  यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, मला संधिवात झाल्याचे निदान झाल्यानंतर माझे आयुष्य उध्वस्त झाले होते. सतत स्नायूंच्या वेदनांनी मला त्रास होत असे. मी पुन्हा कधीही माझ्या पायावर उभे राहू शकणार नाही, असा विचार मनात येऊ लागला. मला नवीन आयुष्य मिळवून देण्याकरिता डॉ. अरबट आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मी आभारी आहे. गेली नऊ वर्षे अंथरुणाला खिळून राहिल्यानंतर आता मी कोणत्याही आधाराशिवाय शारीरीक क्रिया करू शकते, अशी प्रतिक्रिया रुग्ण कुसुम यांनी व्यक्त केली.