सुशीलकुमार शिंदे यांनी काढली पवारांची विकेट

  बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरेंकडून शरद पवारांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांची विकेट काढली. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 21, 2018, 07:55 PM IST
सुशीलकुमार शिंदे यांनी काढली पवारांची विकेट title=

पुणे :  बीएमसीसी महाविद्यालयात राज ठाकरेंकडून शरद पवारांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांची विकेट काढली. 

सुशीलकुमार शिंदे यांनी शरद पवारांबाबत काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, पवार साहेबांचा सत्कार बीएमसीसी ग्राऊंडवर ठेवल्याचा मला आनंद आहे, पवार साहेब याच कॉलेजचे विद्यार्थी होते. शरद पवार कॉलेज जीवनापासून खोडकर असून, अजूनही त्यांचा तो स्वभाव बदललेला नाही. या कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी शरद पवारांवर तोंडभरून कौतुक केलं आहे. शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत.

पाहा नेमकं काय म्हटले सुशीलकुमार शिंदे...

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांसाठी शरद पवारांनी नेहमीच सेक्युलरवादाचा प्रचार केला. शरद पवार हे राजकीयदृष्ट्या जेवढे गंभीर असतात, तेवढेच ते खिलाडूवृत्तीचे आहेत, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाल आहेत. 

या कार्यक्रमाला नागराज मंजुळे, लीला गांधी, हर्षवर्धन पाटील, अशोक सराफ, चंदू बोर्डे, मोहन आगाशे, विश्वजित कदम, हनुमंत गायकवाड, विलास रकटे, सुशीलकुमार शिंदे सारख्या अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली आहे.