बीड : 'जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,' असा प्रण खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत केला होता. अखेर त्यांनी हा प्रण धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून पूर्ण केला. सध्या डॉ. अमोल कोल्हे आपल्या मालिकेमुळे चर्चेत आहेत. 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेचा शेवट झाला आहे.
नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत आयोजित केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची कथा सांगणाऱ्या 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याला आज हजेरी लावली. शंभुराजांची मुख्य भूमिका साकारणारे आदरणीय खा. @kolhe_amol यांना मानाचा फेटा घालून सत्कारही केला. pic.twitter.com/mnwIjZ5Hkk
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 29, 2020
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने परळीत आल्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे निवडून आल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा प्रण केला होता. 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या निमित्ताने हा प्रण पूर्ण केला आहे. ('स्वराज्यरक्षक संभाजी'चा निरोप, कलाकारांसह प्रेक्षकही भावूक)
परळी ते अंबाजोगाईचा रस्ता तीन महिन्याच्या आत पूर्ण करणार, परळीच्या बायपासचे काम एप्रिलमध्ये सुरू होणार, दोन वर्षात परळीत धुळीचा कणही दिसणार नाही अशी प्रदुषणमुक्त परळी मी करणार. अर्थसंकल्पात परळीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी भरीव तरतूद होणार आहे. pic.twitter.com/z0AV6DdWxy
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) February 29, 2020
‘गेल्या चार महिन्यांहुन अधिक काळ खा. अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला नव्हता, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अभिनयातून देशाच्या घराघरात पोचवलेल्या अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो; आज फेटा बांधताना मित्र कसा असावा ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे होय. मी आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्यांना फेटा बांधून त्यांचा प्रण आज पूर्ण केला व त्यांचे व मला निवडून दिलेल्या तमाम परळीकरांचे आभार मानतो’ अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल
परळीत सुरू असलेल्या 'शिवपूत्र संभाजी' महानाट्यावर आज पावसाचे सावट होते. पावसाची पर्वा न करता परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.गेल्या ३ दिवसांपासून संभाजी महाराजांचा इतिहास अनुभवण्यासाठी नागरिकांनी जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार! pic.twitter.com/dqEzue6RaC
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 1, 2020
'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेचा शेवट झाला आहे. मालिकेच्या कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठी शेवटचा दिवस हा अत्यंत जड गेला. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास या मालिकेतून घराघरात पोहोचला.