ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक सध्या भलतेच खूष आहेत.

Updated: Jan 7, 2018, 09:56 PM IST
ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन title=

ताडोबा : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक सध्या भलतेच खूष आहेत. इथं येणा-या पर्यटकांना एक दोन नव्हे चक्क दुडूदुडू धावणा-या चार बछड्यांचं दर्शन होतंय.

'माधुरी' वाघिणीच्या बछड्यांनी ताडोबा बफर झोन सध्या श्रीमंत झालंय.. व्याघ्र पर्यटनासाठी पर्यटक बफर झोनकडे धाव घेत आहेत. दुडूदुडू धावणारे हे बछडे बघण्यासाठी पर्यटक पुन्हा पुन्हा बफर क्षेत्राला पसंती देत आहेत. हवाहवासा वाटणारा हिवाळा, विविध परदेशी पक्षांचं आगमन यामुळे ताडोबातील बुकिंग फुल्ल झालंय. माधुरी आणि तिच्या बछड्यांच्या गोड लीलांनी त्यात आणखीनच भर घातलीये.