close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ठाण्यात शिवसेनेच्या महिला नगरसेविकांना धमकीचे फोन

ठाण्यातील शिवसेनेच्या तीन महिला नगरसेविकांना धमकीचे फोन 

Updated: Sep 18, 2019, 10:20 PM IST
ठाण्यात शिवसेनेच्या महिला नगरसेविकांना धमकीचे फोन

ठाणे : ठाण्यातील शिवसेनेच्या तीन महिला नगरसेविकांना धमकीचे फोन आले आहेत. कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलच्या नावानं फोनवरून धमकी देण्यात आलीय. मंगळवारी रात्रीच्या सुमारास महापौर मिनाक्षी शिंदे यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे  मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली. 

त्यानंतर शिंदे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केलीअसून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौर मिनाक्षी शिंदे यांना धमकीचे फोन आल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.