close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

नवजोतसिंग सिद्धू न आल्याने काँग्रेसला सभा गुंडाळावी लागली

काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिद्धू यांची सभा एन वेळी रद्द झाल्याने काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली.  

Updated: Apr 20, 2019, 08:28 PM IST
नवजोतसिंग सिद्धू न आल्याने काँग्रेसला सभा गुंडाळावी लागली

अहमदनगर : काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिद्धू यांची सभा एन वेळी रद्द झाल्याने काँग्रेस पक्षाला आपली सभा आटोपती घेण्याची वेळ आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आपल भाषण अर्धवट सोडवे लागले. यावेळी नवज्योत सिद्धू यांना ऐकण्यासाठी आलेले नागरिक सिद्धू न आल्याचे कळताच सभा स्थळ सोडून माघारी परतलेत.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ नवज्योत सिद्धू यांच्या सभेच संगमनेर शहरात आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला दुपारी एक वाजण्याची वेळ देण्यात आली होती. नंतर 3 आणि शेवटी 4 ची वेळ करण्यात आली. मात्र, नियोजित वेळेत नवज्योत सिद्धू शिर्डीत पोहोचलेत नाहीत. नवज्योत सिद्धू यांना ऐकण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी ही केली. 

नवज्योत सिद्धू शिर्डी विमानतळावर पोहचले आणि संगमनेरकडे रवाना झाले. मात्र अर्ध्या रस्त्यात आल्यावर उशीर होत असल्याने त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी बाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू होते. मात्र सिद्धू येणार नाही कळताच त्यांनी ही आपले भाषण थांबवत सभा स्थळावरून निघून गेले. यावेळी सिद्ध यांनी मोबाईलवरून संभाषण साधला खरा पण नागरिकांनी निघून जाणे पसंत केले.