रत्नागिरीतील भोंदूबाबाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील तथा पाटीलबुवा आणि त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 1, 2017, 03:17 PM IST
रत्नागिरीतील भोंदूबाबाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला   title=

रत्नागिरी : गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील तथा पाटीलबुवा आणि त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळला आहे. 

पाटीलबुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले 

यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीनअर्ज दोषारोपपत्र दाखल होताच पाटीलबुवाने मागे घेतला. त्यानंतर पुन्हा मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे जामिनासाठी अर्ज सादर केला. मात्र सरकारी वकिलांनी आपल्या युक्तीवादानं पाटीलबुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडले.

जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र 

तीन दिवस चाललेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यालालयाने पाटीलबुवाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गु्न्ह्यांची गंभीर दखल घेत जामीन अर्ज फेटाळून लावल़ा. पाटीलबुवा, प्रशांत पारकर, अनिल मयेकर आणि संदेश पेडणेकर यांच्याविरूद्ध जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केले आहेत.